Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावातील तरुणाचा मृत्यू !
    क्राईम

    धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावातील तरुणाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskNovember 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील गवळीवाडा परिसरात राहणारा राहुल रामदास गवळी (वय २८) हा तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी नांदगाव ते मनमाड दरम्यान घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यात राहुल गवळी हा तरुण वास्तव्यास होता. हातमजूरी करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. शुक्रवारी राहुल हा रेल्वेतून प्रवास करीत असतांना त्याचा तोल जावून तो रेल्वेतून खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्टेशनप्रबंधक यांनी रेल्वे पोलिसांन दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाची ओळख पटवून मृतदेह जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच राहूच्या मित्रांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी राहूचा मृतदेह बघताच त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. राहूच्या पश्चात आई, पत्नी व दोन भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जम्मूमध्ये मोठा अनर्थ टळला : फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न

    March 12, 2026

    भरधाव अर्टिगा कारने नागरिकांना उडवले; पाच जखमी, दोन नंबर प्लेटमुळे संशय वाढला

    March 12, 2026

    मुंबई विधानभवनात सुरक्षिततेसह खळबळ; ई-मेलद्वारे धमकी आल्याने सतर्कता

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.