Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एलसीबीची मोठी कारवाई : सरपंच पदाचा उमेदवार निघाला चोर !
    क्राईम

    एलसीबीची मोठी कारवाई : सरपंच पदाचा उमेदवार निघाला चोर !

    editor deskBy editor deskNovember 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून दुचाकीसह घरफोडीच्या घटना नियमित घडत असतांना स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील सरपंच पदाचा उमेदवार प्रवीण पाटील याला ताब्यात घेऊन 31 घरफोड्या उघड केल्या आहेत. आरोपीने वीस गुन्ह्यांची कबुली दिलेली असून त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार व एक पल्सर मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बिलवाडी या ठिकाणी नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल व सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार प्रवीण पाटील यांचा पराभव झाला. या उमेदवाराने निवडणुकीत चांगलाच पैसा खर्च केला. पैसा खर्च करूनही त्याचा पराभव झाला मात्र त्याच्या रुबाबात कोणताही फरक पडला नाही. त्याच्या प्रगती मागील कारणांमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या सहकार्याने त्याला ताब्यात घेतले.

    आरोपी प्रवीण पाटील याला पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार, एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. त्याने जिल्ह्यात तसेच जिल्हा बाहेर वीस ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबुली दिली आहे. आरोपी हा पोलिसांच्या नाकासमोर असूनही पोलिसांच्या हाती लागत नव्हता ही विशेष बाब आहे. आरोपी प्रवीण पाटील यांनी निवडणूकीत केलेला खर्च व त्याचा झगमगाट पाहून त्याच्यावर वाढलेल्या संशयामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी प्रवीण सुभाष पाटील (वय 32) याला तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले. तीन दिवसांपासून या सर्व गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट इशारा

    March 6, 2026

    वऱ्हाडींच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; नववधूचे दागिने चोरून मध्यप्रदेशात पळाले, दोघांना बेड्या

    March 6, 2026

    धक्कादायक : तरुणीचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू !

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.