Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्यरात्री ट्रक व डंपरचा अपघात : दोन जण जखमी !
    क्राईम

    मध्यरात्री ट्रक व डंपरचा अपघात : दोन जण जखमी !

    editor deskBy editor deskNovember 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    तालुक्यातील बोहर्डी गावानजीकच्या उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने डंपरला जबर धडक दिल्याची घटना १९ नोव्हेंबर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. यात दोन जण जखमी झाल असून याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील साहेबराव पुना कोळी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते डंपरचालक आहेत. १९ नाव्हेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास साहेबराव कोळी हे डंपर (एमएच- १५, एव्ही ४९४८) घेवून मुक्ताईनगर ते भुसावळ दरम्यानच्या बोहर्डी जवळील राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. या वेळी समोरून येणारा ट्रक (आरजे ११, जीसी १३२३) ने डंपरला जबर धडक दिली. या धडकेत डपरवरील चालक साहेबराव कोळी आणि क्लिनर कैलास धुडकू भाई हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, ट्रकचालक हा ट्रक जागेवर सोडून पसार झाला. चालक साहेबराव कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बसस्थानकावर पोलिसाचा धिंगाणा; शासकीय कामात अडथळा, चालकाला मारहाण

    March 5, 2026

    नातवावर आजीची क्रूरता ; रंग उडवला म्हणून उकळते पाणी ओतले !

    March 5, 2026

    सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे खळबळ

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.