Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेताची राखण करणे बेतले जीवावर : एकाचा खून !
    क्राईम

    शेताची राखण करणे बेतले जीवावर : एकाचा खून !

    editor deskBy editor deskNovember 15, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावातील शेत शिवारात अनोळखी चोरट्यांनी दरोडा टाकत या शेताची राखण करणाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. तर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील जळगाव – पाचोरा रस्त्यावरील वावडदा शिवारात काही अनोळखी चोरट्यांनी शेतामध्ये जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत शेताची राखण करणाऱ्या ५२ वर्षीय इसमाचा डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घृण खून केला आहे. तसेच, ट्रॅक्टर व रोटर हिटर चोरून नेले आहे. बिलवाडी येथील रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणाऱ्या शेतामध्ये मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी ते शेताची राखण करण्यासाठी पांडुरंग पंडित पाटील (वय ५२, रा. बिलवाडी) हे गेले होते. मध्यरात्री कधीतरी शेतामध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. तेथे त्यांनी रोटर हिटर व ट्रॅक्टर चोरून घेतले.

    चोरट्याने ट्रॅक्टरचे सामान असलेले अवजड वस्तूने त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्यांचा जागीच खून केला. रोटर हीटर व ट्रॅक्टर घेऊन ते पसार झाले. दरम्यान सकाळी शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र ईश्वर पाटील हा पहाटे ६ वाजता म्हशीचे दूध काढण्यासाठी आला असताना ही घटना उघडकीस आली. त्याने गावातील पोलीस पाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती सांगितली.

    यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांच्या विशेष तपासणी सुरू केली आहे. दरम्यान शेतातून चोरून नेलेले ट्रॅक्टर हे एरंडोल तालुक्यातील खडके फाटा येथे आढळून आलेले आहे. दरम्यान पांडुरंग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. पांडुरंग पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.