Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील चोरट्यांचा पराक्रम : दुकान फोडून मसाला पळविला !
    क्राईम

    जळगावातील चोरट्यांचा पराक्रम : दुकान फोडून मसाला पळविला !

    editor deskBy editor deskNovember 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन ४० हजारांच्या रोकडसह २० हजारांचा सुकामेवा व मसाले चोरुन नेले. ही घटना गुरवारी मध्यरात्रीच्या सुमारास दाणाबाजारात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश नगरात हरिचंद्र कन्हैयालाल ललवाणी (वय ५४) हे वास्तव्यास असून त्यांचे शहरातील दाणाबाजारात सतगुरु ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. दिवाळी सणामुळे दुकानात सुकामेव्यासह इतर माल भरलेला आहे. दि. ९ रोजी रात्री ललवाणी हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले असता, त्यांना दुकानाच्या भिंतीला भगदाड पडलेले दिसून आले. त्यांनी दुकानातील सामानाची पाहणी केली असता, त्यांना दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली ४० हजारांची रोकड व सुमारे २० हजार रुपये किंमतीचा सुकामेवा आणि मसाले चोरीस गेल्याचे लक्षात आले.

    पोलिसांची घटनास्थळी पाहणी
    दुकानात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर ललवाणी यांनी लागलीच घटनेची माहिती शहर पोलीसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली, त्यानंतर हरिचंद्र ललवाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार बशीर तडवी करीत आहेत. रात्रीची गस्त वाढवा शहरात घरफोडीसह चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भरदिवसासह रात्रीच्या सुमारास घरफोडीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.