Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात अवैध लाकडांची वाहतूक करणारे अटकेत !
    क्राईम

    जळगावात अवैध लाकडांची वाहतूक करणारे अटकेत !

    editor deskBy editor deskNovember 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विनापरवाना अवैध लाकडांची वाहतूक सुरु असताना पोलिसांनी एका संशयित आरोपीवर कारवाई करीत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमी मिळाली होती. दि. ८ नोव्हेंबर रोजी टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन (क्रमांक एमएच १५ डीके ३५६) या वाहनामध्ये अवैध लाकडाची वाहतुक होत आहे. बातमीनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता नेरी नाका, पांचाळ गल्ली समोर रोडवर जळगाव टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन मिळुन आले होते. त्यामधे निंब जातीच्या झाडाचे ओले लाकुड मिळाले होते. वाहनावर असलेला चालक सैय्यद मुस्तकिन सैय्यद मुनाफ (वय २५ वर्ष रा. लकड़ी वखार, शिवाजी नगर, जळगाव) हा लाकुड वाहतुकिचा परवाना नसताना अवैध लाकडांची वाहतूक करताना मिळून आला. म्हणून त्याच वाहनासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केलेली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.