Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात सट्टा, मटकावर पोलिसांची कारवाई !
    क्राईम

    जळगावात सट्टा, मटकावर पोलिसांची कारवाई !

    editor deskBy editor deskNovember 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील राजकमल टॉकीज आणि सुभाष डेअरीच्या पाठीमागे या दोन ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या सट्टा, मटका क्लबवर सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांच्या पथकाने छापा टाकून ४ जणांवर कारवाई करण्यात आली. पोलीसांनी केलेल्या दोन ठिकाणच्या कारवाईत एकूण ३ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष डेअरी आणि शनीपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजकमल टॉकीज परिसरात अवैधरित्या सट्टा व मटका क्लब सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान पथकाने दोन्ही ठिकाणी छापा मारून संशयित आरोपी सचिन आनंदा जाधव, संजय भाऊलाल चौधरी आणि सखाराम भटू चौधरी या तिघांना ताब्यात घेतले तर राजू पाटील हा फरार झाला आहे. पोलीसांनी केलेल्या करवाईत ३ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी सायंकाळी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, नाना तवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, बालाजी बारी, मनोहर वानखेडे यांनी कारवाई केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.