Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिओने दिली ग्राहकांना दिवाळीची मोठी ऑफर !
    lifestyle

    जिओने दिली ग्राहकांना दिवाळीची मोठी ऑफर !

    editor deskBy editor deskNovember 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    देशभरात दिवाळीची मोठी धामधूम सुरु झाली असतांना आता अनेक कंपन्या बाजारात मोठी ऑफर देखील आणलेल्या आहे. जेणे करून कस्टमर आपल्याशी जोडला जाईल. या दिवाळीला देखील अनेक कंपन्या दिवाळीसाठी आपल्या ग्राहकांसाठी उत्तम ऑफर्स घेऊन येत आहेत.

    ऑफलाइन मार्केट आणि ऑनलाइन मार्केटमध्येही विविध डिस्काऊंट ऑफर्स सुरु आहेत. आता रिलायन्स जिओनेही आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. जिओने आपल्या रिचार्ज प्लान लिस्टमध्ये एक शानदार प्लॅन जोडला आहे. या प्लॅनमध्ये दिवाळी ऑफर अंतर्गत जिओ आपल्या ग्राहकांना 900GB डेटा देत आहे, तर 23 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते.

    रिलायन्स जिओचा 2,999 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन युजर्संना संपूर्ण वर्षासाठी म्हणजेच 365 दिवसांसाठी रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्ती देतो. म्हणजे वर्षभर रिचार्ज कारण्यासाची झंजट संपून जाते. यात 23 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते.

    या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळेल. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS मिळतात. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर युजर्संना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये एकूण 900GB डेटा मिळतो. विशेष म्हणजे जर तुम्ही 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात राहत असाल तर त्या सदस्यांना अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेता येईल.

    ग्राहक या जिओ दिवाळी ऑफरला मायजिओ अॅपवरील सध्याच्या कॅशबॅक ऑफर्ससोबत जोडून त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात. मात्र जिओकडून हे स्पष्ट झालेले नाही की ही दिवाळी रिचार्ज ऑफर फक्त मायजिओ अॅपवर लागू आहे की ग्राहक ऑफरचा लाभ घेण्यासाठी इतर यूपीआय अॅप्सचा वापर करू शकतात. मात्र, सध्या पेटीएमसारख्या प्लॅटफॉर्मवर हा पर्याय दिसत नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.