Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रात्रीच्या अंधारात चारचाकी आढळली झाडावर अन एक जागीच ठार
    क्राईम

    रात्रीच्या अंधारात चारचाकी आढळली झाडावर अन एक जागीच ठार

    editor deskBy editor deskOctober 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील शेरी लोंद्री रस्त्यावरील वळण रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भजनी मंडळाच्या कारला भीषण अपघात झाला यात एक जागीच ठार झाले तर अन्य दोन जण जखमी असून, एक गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिंपळगाव गिरणा थडी येथील भजनी मंडळ कारने (एमएच १९, सीवाय ४५०८) भजनासाठी कासली (ता. जामनेर) येथे लोंद्री मार्गाने जात असताना शेरी-लोंद्री रस्त्यावरील योगेश पाटील यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार झाडावर आदळली. कारमध्ये एकूण पाच जण बसलेले होते.

    यातील दिलीप रमेश पाटील जागीच ठार झाले तर हेमंत सुभाष पाटील (३२) हे गंभीर जखमी असून, सतीश साहेबराव पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. अन्य दोन जण बचावले आहेत. शेरी ग्रामस्थांबरोबरच घटनास्थळी पोलिस कर्मचारी रवींद्र देशमुख, भरत लिंगायत, हेमंत सोनवणे यांनी तातडीने येत मदतकार्य केले. रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने जखमींना तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात पोलिस वाहनातून दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून जळगावला हलविण्यात आले. सोमवारी मृत दिलीप पाटील यांचे शवविच्छेदन करून मतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेने समस्त पिंपळगाव गिरणा थडी परिसरावर शोककळा पसरली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.