Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर भीषण अपघात : ट्रकचालक ठार तर दोन जखमी !
    क्राईम

    महामार्गावर भीषण अपघात : ट्रकचालक ठार तर दोन जखमी !

    editor deskBy editor deskOctober 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    भुसावळ तालुक्यातील फेकरी टाक्यानजीक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक व कंटेनरची समोरा-समोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक चालकाचा जागीच ठार झाला तर कंटेनरमधील दोघे गंभीर जखमी झाले.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहराकडे येत असलेला भरधाव ट्रक (जी.जे.12 बी.एच.5252) व भुसावळकडून नागपूरकडे निघालेला कंटेनर (डब्ल्यू.बी. 11 ई.5686) यांच्यात समोरा-समोर धडक झाली. ही धडक इतकी जबर होती की दोन्ही वाहनांच्या समोरून भाग पूर्णपणे चेपला जावून वाहनांचे मोठे नुकसान झाले तर एका वाहनावरील चालकाचा मृत्यू झाला तर दुसर्‍या वाहनावरील चालकासह क्लीनरल जखमी झाला. स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना बाहेर काढण्यात मदत केली तर अपघातामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक दोन ते तीन किलोमीटरपर्यंत खोळंबली. भुसावळ तालुक्याचे हवालदार प्रेमचंद सपकाळे, श्यामकुमार मोरे, सादीक शेख, रशीद तडवी, शहर वाहतूक शाखेचे राजेंद्र वाणी आदींनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

    #accident
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    जळगाव पोलीस कर्मचाऱ्याने चाळीसगावात संपविले आयुष्य !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.