Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आज सर्व मिटवायचे आहे म्हणत घरी बोलविले अन विवाहितेचा विनयभंग !
    क्राईम

    आज सर्व मिटवायचे आहे म्हणत घरी बोलविले अन विवाहितेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskOctober 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    घरी बोलवत मला सर्व मिटवायचे आहे, तू घरी ये असे सांगून जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विवाहितेला घरी बोलवून तिचा विनयभंग करण्यात आला. विनयभंग करण्याऱ्या डिगंबर ऊर्फ सुनील जानकीराम चौधरी (रा. निवृत्तीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव  जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेशी डिगंबर चौधरी याने २३ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. मला सर्व मिटवायचे असून, तू घरी ये असे सांगून दुपारच्या वेळेस घरी बोलविले. ही महिला त्याच्या घरी गेली असता काही समजण्यापूर्वीच त्याने महिलेच्या तोंडावर मारले व तिचा विनयभंग केला. तू मला हवी आहेस असा तो ओरडू लागल्याने चौधरी याची आई व भाची घरातून बाहेर आले. महिलेने त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला असता तिचे कपडेही या तरुणाने फाडले. याप्रकरणी महिलेने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डिगंबर ऊर्फ सुनील चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वंदना चौधरी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.