Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तो आला होता चरस विकायला अन लागला पोलिसांच्या हाती !
    क्राईम

    तो आला होता चरस विकायला अन लागला पोलिसांच्या हाती !

    editor deskBy editor deskOctober 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील पोलीस अनेक मोठमोठ्या कारवाई करून आरोपींना बेड्या ठोकत असतांना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नवी मुंबई येथे चरस विक्रीसाठी आलेल्या एकाला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५ लाख १० हजार रुपये किमतीचे चरस हस्तगत करण्यात आले आहे. एमआयडीसी परिसरात तो चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून हि कारवाई केली आहे.

    तुर्भे एमआयडीसी परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी निरीक्षक संजय जोशी, सहायक निरीक्षक निलेश येवले यांचे पथक केले होते. या पथकाने गुरुवारी एच.पी. कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला होता. त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या एकावर पथकाला संशय येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्याकडे १ किलो ३१८ ग्रॅम चरस आढळून आले. बाजारभावानुसार त्याची किंमत ५ लाख १० हजार रुपये आहे. याप्रकरणी संजीव प्रकाश पाटील (३२) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तो नेरूळच्या बांचोली परिसरात राहणारा असून टेम्पो चालक आहे. हे चरस घेऊन त्याठिकाणी तो विक्रीसाठी आला होता. त्याने हे ड्रग्स कुठून आणले याचा अधिक तपास तुर्भे एमआयडीसी पोलिस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.