Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : आ.खडसेंच्या अडचणीत वाढ ; १३७ कोटींच्या दंडाची नोटीस !
    क्राईम

    मोठी बातमी : आ.खडसेंच्या अडचणीत वाढ ; १३७ कोटींच्या दंडाची नोटीस !

    editor deskBy editor deskOctober 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बातमीदार | १९ ऑक्टोबर २०२३

    राज्यातील राष्ट्रवादीचे नेते व आ.एकनाथराव खडसे पुन्हा अडचणीत आले असून अवैध गौण खनिज उत्खनात त्यांना 137 कोटीची दंडाची रक्कम नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता.

    खडसे परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर. जमिनीची खरेदी करण्यात आली होती. याप्रकरणी अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२ १५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या दंडाची नोटीस मुक्ताईनगर बजावली आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी १ लाख १२ हजार ११७ इतके आहे. यापोटी पाच पटींनी दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली देऊ. आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.