Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मित्रामध्ये वाद बेतला जीवावर ; एकाचा मृत्यू !
    क्राईम

    मित्रामध्ये वाद बेतला जीवावर ; एकाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    वरणगाव फॅक्टरी परिसरातील सुशील नगर सर्कलनजीक मित्रांमध्ये किरकोळ वादातील कुरापतीचा वाद वाढल्याने डोक्यात काठी मारताच मित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी प्रमोद ज्ञानेश्वर महाजन (वय ५८) हे मुक्ताईनगरातील ८१ गाव पाणीपुरवठा विभागात कर्मचारी आहे. हे एका मित्रासोबत वरणगाव फॅक्टरीतील सुशील नगर सर्कलवर आल्यानंतर त्यांची संशयित आरोपी तथा मित्र असलेल्या दीपक सिंग सोबत भेट झाली. यावेळी गप्पांमध्ये जुना वाद उकरून निघाल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली व काहींनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला मात्र पुन्हा कुरापत निघाल्यानंतर संशयित दीपक सिंगने काठीचा फटका प्रमोद महाजन यांच्या डोक्यावर मारताच घाव वर्मी लागताच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा धडाका : आयपीएलपूर्व इंग्लंडविरुद्ध जुलैमध्ये धमाका

    March 12, 2026

    जम्मूमध्ये मोठा अनर्थ टळला : फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न

    March 12, 2026

    मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा ; “नवनिर्माण नावाला तरी साजेसे काम करा” !

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.