उज्जैन : वृत्तसंस्था
एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी दांडी आश्रमाजवळ ही मुलगी अर्धवट कपड्यांमध्ये आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिचे कपडे रक्ताने माखले होते. ती सुमारे संवरखेडी सिंहस्थ बायपासच्या वसाहतींमध्ये अडीच तास भटकत राहिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती ८ किलोमीटर चालल्याने दिसत आहे. हि घटना उज्जैनमध्ये घडली आहे.
आईसोबतही चुकीचे कृत्य झाले असा दावा ती करते; पण तिची आई कुठे आहे आणि ती उज्जैनला कशी पोहोचली, याबाबत तिला काही सांगता येत नाही. अतिरक्तस्रावामुळे मुलीला इंदूरच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी बलात्कार झाल्याला दुजोरा दिला आहे. तिच्या बोलण्यावरून मुलगी प्रयागराजची रहिवासी असावी, असा अंदाज पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी वर्तवला.


