Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावच्या शेतकरी पुत्राचा जुगाड ; पाणी नसताना होणार शेती !
    कृषी

    जळगावच्या शेतकरी पुत्राचा जुगाड ; पाणी नसताना होणार शेती !

    editor deskBy editor deskSeptember 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    गेल्या काही वर्षापासून राज्यातील शेतकरी नेहमीच पावसाच्या कारणाने नेहमीच संकटात असतो. पण खान्देशातील एका शेतकऱ्याच्या पुत्राने जुगाड केले आहे. जळगावमधल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने अशा पावडरचं संशोधन केलंय ज्यामुळे तब्बल दोन महिने शेतीला पाण्याची गरज भासणार नाही. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या शेतकरीपुत्राची दखल घेतली आहे.

    जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पुत्र व मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील पवार या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असे संशोधन करून एक विशिष्ट जैविक पावडर उत्पादित केली आहे. ही पावडर पेरणीच्या वेळी बियाण्यासोबत मिश्रण करुन दिल्यानंतर पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही, असा दावा सुनील पवार यांनी केला आहे. या पावडरचे पेटंट देखील सुनील पवार यांनी नोंद केले आहे. सुनील पवार यांच्या संशोधनाची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली आहे. पवार यांच्याशी मुंडेंनी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांची एक टीम पुढील आठवड्यात सुनील पवार यांनी संशोधन केलेल्या या पावडरचा व त्यांनी वापर केलेल्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जाणार आहे.

    मका व अनेक दिवस पाणी आपल्यात साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या अन्य काही जैविक घटकांना एकत्र करून ही जैविक पावडर बनवण्यात आली आहे. यामुळे दीड ते दोन महिने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या पावडरमध्ये आहे. कमी पावसाच्या किंवा दुष्काळी भागात ही पावडर शेतीला वरदान देणारी ठरणार असल्याचा दावा सुनील पवार यांनी केलाय. ”सदरील प्रयोग पूर्णपणे जर यशस्वी झाला तर शेतीक्षेत्रात क्रांती घडू शकते. तसेच दुष्काळी व अवर्षणग्रस्त भागात देखील ही पावडर एक प्रकारचे वरदान ठरणार आहे. म्हणूनच चाळीसगाव येथे आम्ही लवकरच कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची एक टीम सुनील पवार यांच्या भेटीला पाठवत आहोत. या टीमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ”, असे मत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

    agriculture Farmer new technology
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    केंद्र सरकारची तयारी पूर्ण; नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नवा हप्ता

    November 12, 2025

    नुकसानभरपाई व रब्बी हंगामपूर्व अनुदान तात्काळ द्या : धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन !

    October 30, 2025

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांनी दिवाळीतच सुरु केले उपोषण !

    October 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.