नांदेड : वृत्तसंस्था
प्रत्येक महिला असो वा पुरुष प्रत्येकाला रस्तावर लावलेली पाणीपुरीची दुकान दिसली कि लागलीच पाय दुकानाकडे वळत असतात. पण हीच पाणीपुरी धोकादायक ठरली आहे. नांदेडमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या इसमाने असं मोठं कांड केलंय जे ऐकून तुमची भीतीने गाळणच उडेल. एक साधासुधा, पाणीपुरी विकणारा माणूस अट्टल गुन्हेगार निघाला. पाणीपुरी व्यवसायाच्या नावाखाली तो चक्क गावठी कट्टा म्हणजे पिस्तुल विकत होता की ओ ! हो, हे अगदी खरं आहे आणि त्या भामट्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा खरा चेहरा उघड झाला. पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
संजय परिहार अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मध्यप्रदेश राज्यातील बिल्हेटी येथील रहिवासी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो भोकर येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करायचा. मात्र हा आरोपी नवीन मोंढा परिसरात गावठी कट्टे आणि काडतूस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी मिळाली. त्यांनी तत्काळ कारवाई करत त्या इसमास लगेच ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे दोन गावठी कट्टे ( पिस्तुल) आणि पाच जिवंत काडतुसं सापडली. आरोपी हा पाणीपुरीच्या व्यवसायाच्या नावाखाली लपूनछपून हत्यारं विकायचा. तो मध्यप्रदेश मधून गावठी कट्टे आणायचा आणि नांदेडमध्ये विक्री करायचा. यामागे मोठी टोळी कार्यरत असून पोलीस त्या दृष्टीने तपास करताहेत अशी माहिती पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी दिली


