Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बँकेत नंबर अपडेट केला अन झाली फसवणूक !
    क्राईम

    बँकेत नंबर अपडेट केला अन झाली फसवणूक !

    editor deskBy editor deskSeptember 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

     

    देशात अनेकदा ऑनलाईन स्कॅम मोठ्या संख्येने वाढत असून लोकांचा पैसा लुटण्यासाठी स्कॅमर्स अनेक मार्ग शोधत आहेत. असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यात रमनदीप एम ग्रेवाल यांची स्कॅमर्सने 57 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या व्यक्तीने एका छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ऑनलाईन फसवणूक झाली. सिम डिस्कनेक्ट झाल्यानंतर ती व्यक्ती आपला फोन नंबर बँकेत अपडेट करायला विसरली होती.

    एका रिपोर्टनुसार, लुधियानात नुकतीच ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. त्यामध्ये एचडीएफसी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणारा सुखजित सिंह, बिहारचा लव कुमार, गाझीपूरचा नीलेश पांडे आणि दिल्लीचा अभिषेक यांचा समावेश होता. या स्कॅमर्सनी रमनदीप एम ग्रेवाल नावाच्या व्यक्तीला लक्ष्य केले आणि त्याचा जुना डिस्कनेक्ट केलेला फोन नंबर वापरून त्याच्या बँक खात्यातून 57 लाख रुपये काढले.

    स्कॅमर्सनी प्रथम अशा लोकांचा शोध घेतला ज्यांचे तपशील सहजपणे काढले जाऊ शकतात, ज्यात अनेक वृद्ध लोक आणि इनएक्टिव्ह अकाऊंट असलेल्या लोकांचा समावेश होतो. मग त्याने रमनदीपच्या खात्याचा तपशील काढला. तेव्हा त्यांना कळलं की त्यांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर डिस्कनेक्ट करून दुसऱ्याला देण्यात आला आहे. स्कॅमर्स सिमच्या नवीन मालकाला फोन करून नोकरीचे आमिष दाखवून सिम ट्रान्सफर करून घेतात.

    स्कॅमर्सना ओळखीची कागदपत्रे मिळाली आणि त्यांनी नंबर पोर्ट केला. नंतर फोन नंबर वापरला गेला आणि ग्रेवालची नेट बँकिंग हॅक झाली. ईमेल बदलून नेट बँकिंगद्वारे नवीन डेबिट कार्ड बनवलं. त्यानंतर त्यांनी खात्यातून तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. हा प्रकार ग्रेवाल यांना समजताच त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या लोकांकडून 17.35 लाख रुपये जप्त केले. वेगवेगळ्या बँक खात्यांमधील 7.24 लाख रुपये गोठवण्याबरोबरच एक मॅकबुक एअर, चार मोबाईल फोन, तीन चेकबुक आणि आठ एटीएम डेबिट/क्रेडिट कार्डेही जप्त करण्यात आली आहेत.

     

     

    #crime #reap #nagpur #police #topnews Bank Crime Fraud
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तीन दुचाकीसह चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात !

    November 15, 2025

    राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा :राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय !

    November 15, 2025

    महसूल पथकाची धाड नदीपात्रात कोट्यावधीची वाळू जप्त !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.