Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हातभट्टी दारू विकणाऱ्यावर एमपीडीएची कारवाई !
    क्राईम

    हातभट्टी दारू विकणाऱ्यावर एमपीडीएची कारवाई !

    editor deskBy editor deskSeptember 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    हातभट्टी दारू विक्रीसह वेगवेगळ्या प्रकारचे एमआयडीसी पोलिस ठाण्यात १४ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आझाद बहादूर भाट (४१, रा. सुप्रीम कॉलनी) याला एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

     

    आझाद बहादूर भाट याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तसे आदेश दिले. त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली. ही कारवाई पोउनि दीपक जगदाळे, रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, पोकों विशाल कोळी, राहुल रगडे, हसीना तडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी पंडित पाटील यांनी केली

    daru jilhadhikari MPDA
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.