Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई दसरा दिवाळी पर्यंत देणार !
    कृषी

    शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई दसरा दिवाळी पर्यंत देणार !

    editor deskBy editor deskSeptember 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पालकमंत्र्यांच्या मागणीनंतर कृषी मंत्र्यांचे निर्देश

     

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    खरीप हंगामाअंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील २७ महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या निकषात पात्र ठरले आहेत. त्यांना नुकसान भरपाईच्या २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपर्यंत देण्याचे आदेश कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी मुबंई येथील बैठकित दिले. जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही मागणी केली होती. त्यावर कृषीमंत्र्यांनी तात्काळ आदेश काढले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.*

     

    जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री धनजंय मुंडे यांना पत्र देवून मागणी केली होती, यात त्यांनी म्हटले होते कि, पंतप्रधान पिक विमा योजनतेर्गंत ज्या महसूल मंडळामध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे, अशा सुमारे २७ महसूल मंडळातील शेतकरी पिक विमा निकषाप्रमाणे पात्र ठरले आहेत. जिल्हयातील या पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याच्या निकषाप्रमाणे २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती क्षेत्र पडताळणी करून तात्काळ देण्याबाबत संबधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत.

     

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या या पत्रनुसार कृषी मंत्री धनजंय मुडे यांनी मुबंईत मंत्रालया बैठक आयोजित केली होती, यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पूर्नवसन मंत्री अनिल पाटील, कृषी सचिव अनुकुमार यादव, व कृषी आयुक्त सुनील चव्हाण , पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील उपस्थित होते.

     

    याप्रसंगी कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी तातडीने निर्देश दिले, की, राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांमध्ये पात्र झालेल्या २७ महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई विमा निकषाप्रमाणे देय असून, पात्र महसूल मंडळांबाबत तत्काळ अधिसूचना निर्गमित करण्याबाबतच्या सूचना यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दिवाळीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची दसरा दिवाळी शेतकरी सुखी होवो म्हणून सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी जिल्हा पीक विमा व शेतकरी समितीचे सी.ए. हितेश आगीवाल व मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे हेही उपस्थित होते.

    Farmer palakmantri Gulabrao Patil Pik vima
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय : शेतकऱ्यांना सर्व सेवा एकाच छताखाली; कृषी समृद्धी योजना वेगाने राबविणार !

    November 26, 2025

    पंतप्रधान मोदींचे मोठे विधान : “शतकांच्या जुन्या जखमा आज भरल्या…”

    November 25, 2025

    धरणगावात रात्रीच्या भारनियमनने शेतकरी त्रस्त; थंडीच्या कडकडीत पाणी देण्याची रात्रपाळी

    November 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.