जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर मनपात सरदार वल्लभभाई पटेल व पिंप्राळा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे लोकापर्ण करण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी शहरात आले असता त्यांचे राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांनी भेट घेतल्याने जळगाव ग्रामीण मतदार संघात राजकीय चर्चेला उधान आले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी आज सकाळी १० वाजता जळगावात आले असता त्यांचे माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांचे यांचे चिरंजीव विशाल देवकर यांच्यासह हेमंत पाटील, धवल पाटील, सुरज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विशाल देवकर यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकी बाबत शुभेच्या देखील दिल्याचे समजते.


