Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बदनामी ; पोलिसात तक्रार !
    क्राईम

    पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बदनामी ; पोलिसात तक्रार !

    editor deskBy editor deskSeptember 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी एका विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहरातील लहान माळी वाडा येथील रहिवासी विलास रामा महाजन (वय ४२) यांनी फिर्यादीनुसार, मी सन 2022 पासुन शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा धरणगाव शहर अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहे. आज दिनांक ०५ रोजी 12.43 वा सुमारास आमच्या धरणगाव शहरातील धरणगाव प्रेस व धरणगाव शहरातील तालुक्यातील इतर सोशल मिडीया (फेसबुक, इंस्ट्राग्राम, व्हॉटसप ) ग्रुप वर ऑडीओ क्लीप वायरल झाली त्यात जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मोबाईलवर छत्रपती संभाजी नगरातील एका व्यक्तीने त्याच्या मोबाईल यावरुन फोन करुन जालना जिल्हयात मराठा आरक्षणा संदर्भात झालेल्या घटने संदर्भात चर्चा करत असतांना त्याव्यक्तीने अचानक चर्चा करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अपशब्द वापरुन शिवीगाळ केली. सर्व संविधानाने निवडुन आलेल्या लोकप्रतिनीधाचा जाहीर अपमान केला व अब्रुनुकसान केली. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकत्याच्या भावना दुखावल्यामुळे कार्यकत्याचे श्रध्दा स्थान असलेले गुलाबराव पाटील यांच्या विषयी कार्यकर्ते एका ठिकाणी जमु लागले त्यात कार्यकर्ते संतोष वाल्मीक महाजन, प्रविण रघुनाथ चौधरी सर्व रा.धरणगाव यांनी सांगीतले की सदर क्लीप ही धरणगाव शहरातील इतर व्यक्तीनी क्लीप व्हायरल करुन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अब्रुनुकसान केली आहे. याकरीता छत्रपती संभाजी नगर व धरणगावातील दोन व्यक्तीविषयी माझी कायदेशीर तक्रार आहे. माझी वरील तक्रार मी वाचुन पाहीली ती माझ्या सांगणे प्रमाणे बरोबर व खरी असुन संगणकावर टंकलीखीत केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.