Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलानेच केली आई व लहान भावाची हत्या ; राज्यातील खळबळजनक घटना !
    क्राईम

    मुलानेच केली आई व लहान भावाची हत्या ; राज्यातील खळबळजनक घटना !

    editor deskBy editor deskSeptember 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक घटना प्रेमसंबधामुळे घडत असल्याचे चित्र सध्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. अशीच एक खळबळजनक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाला विरोध करत होती म्हणून मुलानेच आई आणि लहान भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या करुन मृतदेह दिवाणमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. नीलिमा कापसे आणि आयुष कापसे अशी मयत माय-लेकाची नावं आहेत. अमरावतीच्या मोर्शी येथे शिवाजी नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सौरभ कापसे असे आरोपी मुलाचे नाव आहे. या दुहेरी हत्याकांडाने मोर्शी शहर हादरलं.

    सौरभ याचे वडील वारले आहेत. यामुळे आईनेच त्याचा आणि लहान भावाचा सांभाळ केला. सौरभचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरु होते. मात्र त्याच्या आईला हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. यावरुन दररोज घरी वाद होत असत. अखेर हा वाद विकोपाला गेला आणि सौरभने आई आणि लहान भावाची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने दोन्ही मृतदेह घरातील दिवाणमध्ये टाकून दाराला कुलूप लावून फरार झाला.

    आईचे वडील पाच दिवसांपासून आपल्या मुलीला फोन लावत होते. मात्र तिचा फोन लागत नव्हता. यामुळे अखेर वडील मुलीला भेटायला तिच्या घरी आले. घराजवळ येताच आतून दुर्गंधी येत होती. यामुळे मोर्शी पोलिसांनी बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा खोलून आत प्रवेश केला. आतील दृश्य पाहून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलगी आणि नातवाचा मृतदेह दिवाणमध्ये पडला होता. चौकशी केली असता मोठ्या मुलाच्या प्रेमसंबंधांची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच पाच दिवसापासून मोठा मुलगा फरारही आहे. तसेच मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमहीही आहे. याआधी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. यावरुन मुलानेच आई आणि भावाची हत्या केल्याचा संशय अधिक बळावला आहे. पोलीस फरार मुलाचा शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.