Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विधान परिषदेच्या रिंगणात भाजपकडून अमरिश पटेल
    धुळे

    विधान परिषदेच्या रिंगणात भाजपकडून अमरिश पटेल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 18, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धुळे नंदुरबार  विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपाकडून अमरिशभाई पटेल यांना मैदानात उतरवण्यात आले आहे विधान परिषदेच्या राजकीय घडामोडींना वेग जरी आला असला ही निवडणूक अमरीश भाई पटेल बिनविरोध होतात की त्यांना या निवडणुकीत कडवी झुंज द्यावे लागणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


    धुळे नंदुरबार जिल्हा म्हटलं ती त्या ठिकाणी अमरीश भाई पटेल यांचे नाव सर्वात आधी येते ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा वरचष्मा या दोन्ही जिल्ह्यात दिसून येतो विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर जरी कसली असली तरी भाजपने यात आघाडी घेतली आहे भाजपाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर महा विकास आघाडीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे अमरिशभाई पटेल यांना कडवी झुंज द्यावी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    अमरिशभाई पटेल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका  झाल्या होत्या त्यामध्ये ते विजयी झाले होते आघाडीची 115 मते फुटल्याने पटेल यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत विजयी झाले असले तरी त्यांचा कार्यकाळ 12 महिन्यांचा होता. या निवडणुकीत अमरिश पटेल यांना 332 तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय होता. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला होता.

    पुनरावृत्ती होणार?


    या निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मतं फुटली. जर आकड्यातच बोलायचं झालं तर भाजपाचे 199 तर महाविकास आघाडीचे 213 इतकी मतं होती. मात्र महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याने अभिजित पाटील यांचा पराभव झाला आणि भाजपाचे अमरिश पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. अमरिश पटेलांच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होते. त्यामुळे आता होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    धुळे- नंदुरबार निवडणुकीतील संख्याबळ
    भाजप – 199
    काँग्रेस – 157
    राष्ट्रवादी – 36
    शिवसेना 22
    एमआयएम – 9
    समाजवादी पार्टी – 4
    बहुजन समाज पार्टी – 1
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1
    अपक्ष – 10


    गेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडे उमेदवार विजयी होईल इतके मत असतानाही भाजपा उमेदवाराचा विजय झाला होता. या वेळेस महाविकास आघाडीचे मतदान वाढले आहे. मात्र उमेदवार कोण असेल यावर सर्व गणिते अवलंबून राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

    चौधरी काय करणार? सर्वांचं लक्ष लागलं
    दरम्यान, शिरीष चौधरी हे भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्यास तो भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे अमरिशभाई पटेल यांच्या वर्चस्वालाही धक्का पोहोचू शकतो असं सांगितलं जातं. त्यामुळे चौधरी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय मतांची बेगमी असूनही काँग्रेस त्याचा कसा वापर करून घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    नगर परिषद, नगर पंचायतीचा निकाल पडणार लांबणीवर !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.