Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » श्रावण सोमवारी महिला जात होती दर्शनाला अन घडले ते हृदयद्रावक !
    क्राईम

    श्रावण सोमवारी महिला जात होती दर्शनाला अन घडले ते हृदयद्रावक !

    editor deskBy editor deskAugust 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक भावीक महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात आहेत. वसईतील तुंगारेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पण दर्शनाला आलेल्या एका महिलेसोबत हृदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. हि घटना वसईत घडली आहे. पतीसोबत बुलेटवर बसून तुंगारेश्वर दर्शनाला गेलेल्या पत्नीचा ओढणीने घात केला. बुलेटवरुन जात असताना महिलेची ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकल्याने गळफास बसून तिचा मृत्यू झाल्याची धक्क्दायक घटना घडली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत ही घटना घडली. प्रतिमा यादव असे मयत महिलेचे नाव असून, ती कांदिवलीतील रहिवासी आहे. या घटनेमुळे कांदिवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    कांदिवलीतील रहिवासी असलेले यादव पती-पत्नी रविवारी सुट्टी असल्याने वसईतील तुंगारेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. रविवारी पहाटे महादेवाचे दर्शन घेऊन पती-पत्नी बुलेटवरुन कांदिवली येथे घरी परतत होते. कांदिवली पश्चिमेतील ईराणीवाडी येथे यादव दाम्पत्य राहते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत महिलेच्या गळ्यातील ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्यानंतर चाकात गुंडाळत गेली. यामुळे प्रतिमा हिच्या गळ्याला फास बसून ती खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    #accident Women died
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.