एरंडोलवर शोककळा : तीन तरुण दुर्देवाने नदीत बुडाले !
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी या दिवशी अनेक ठिकाणाहून कावड यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे अशीच कावड यात्रा एरंडोल शहरातून देखील निघाली ही यात्रा रामेश्वर या तीर्थस्थळावर गेली असता या ठिकाणी तीन तरुण तापी नदीच्या संगमावर पोहायला गेले असता तीन तरुणाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातून आज पार्टीच्या सुमारास कावड यात्रा रामेश्वर या ठिकाणी जाण्यास निघाली होती ही यात्रा दुपारच्या सुमारास रामेश्वर येथे पोहोचले या ठिकाणी तापी नदीचा संगम असल्याने काही तरुण पोहायला गेले असता त्यात सागर शिंपी अक्षय शिंपी व पियुष शिंपी या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना जशी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असता घटनास्थळी पोलीस प्रशासन व आपत्ती विभागाचे पथक रवाना होऊन पट्टीचे पोहणारे तरुणांकडून बेपत्ता झालेल्या तरुणांना शोधण्याची मोहीम सुरू होती ही घटना एरंडोल शहरात आली असता शहरावर शोककळा पसरली असून एकच हळहळ व्यक्त होत आहे.



