Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » व्यापाऱ्याला मारहाण करून लुटणारे तिघे अटकेत !
    क्राईम

    व्यापाऱ्याला मारहाण करून लुटणारे तिघे अटकेत !

    editor deskBy editor deskAugust 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

     

    शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी एका कापड व्यापार्‍याला कट मारल्याचा बहाणा करून मारहाण करून व्यापार्‍याकडील ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने तीन जणांना अटक केली आहे. संशयिताना न्यायालयात हजर केले असता २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

    हर्षल संजयकुमार सावकारे (वय-२७, रा.पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ), आनंद प्रकाश पवार (वय-२० रा.नागसेन कॉलनी, कंडारी, ता.भुसावळ) आणि अनिकेत सदानंद सोनवणे (वय-२३ रा. सराफ बाजार, भुसावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची आणावे आहे. किशोर रामेश्वर सदावर्ते (वय-३१ रा. नागपूर) हे कापड व्यापारी असून ते मित्रासह कारने सुरत येथे कपडे खरेदीसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात कारने दोघे नागपूरकडे निघाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हॉटेल तनारीकासमोरील उड्डाण पुलावर व्यापार्‍यांच्या चारचाकीला त्रिकूटाने मोपेडद्वारे कट मारला व वाहन अडवत दोघांना मारहाण करीत केली तसेच व्यापार्‍याच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची व ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व ४ हजार रुपये किंमतीचे व २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व ५०० रुपये किंमतीची कापडी बॅग (ज्यात एटीएम, आधारकार्ड, लायसन्स होते) संशयितांनी हिसकावून पोबारा केला होता.

    पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, गुन्हे शोध पथकातील निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, तेजस पारीस्कर, पोहेकॉ प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी, जावेद शहा यांनी हि कारवाई केली. तपास सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सुदर्शन लाड करीत आहेत.

    Bhusawal Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.