Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावतील प्रसिद्ध डॉक्टरला तुरुंगवासाची शिक्षा; काय आहे प्रकरण..!
    क्राईम

    जळगावतील प्रसिद्ध डॉक्टरला तुरुंगवासाची शिक्षा; काय आहे प्रकरण..!

    editor deskBy editor deskAugust 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील गणपती हॉस्पिटलचे संचालक डॉ. शीतल ओसवाल यांना तीन धनादेश अनादर प्रकरणात ५० लाखांचा दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

    याचिका करते अनिल शिरसाळे व त्यांच्या पत्नी २००२ पासून डॉ. शीतल ओसवल यांचे गणपती हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कामाला होते. सेवेपोटी या दाम्पत्याला डॉ. ओसवाल यांनी ५५ लाखांचे धनादेश वेतनपोटी दिले. सोबतच धनादेश दिल्याचे पत्र दिले होते. डॉ. ओसवाल यांनी दिलेले दहा लाखांचे दोन व पाच लाखांचा एक धनादेश वटला नव्हता. यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेत, धनादेश अनादरप्रकरणी तीन याचिका दाखल केली होती. त्यानुसार प्रथम वर्ग न्या. जान्हवी केळकर यांच्यासमोर तीनही खटले चालले. त्यात डॉ. ओसवाल दोषी ठरल्याने तीनही खटल्यांत त्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. शिरसाळे यांच्या वतीने अॅड. आर. आर. गिरनारे व अॅड. हेमंत गिरनारे यांनी काम पाहिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.