Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुन्हा वादाची ठिणगी ; संभाजी भिडेंना बच्चू कडूंनी दिला इशारा !
    राजकारण

    पुन्हा वादाची ठिणगी ; संभाजी भिडेंना बच्चू कडूंनी दिला इशारा !

    editor deskBy editor deskAugust 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती : वृत्तसंस्था

     

    संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडून तिरंगा ध्वजासोबतच भगवा ध्वज फडकवू असे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. यामुळे अमरावती शहरात बच्चू कडू व संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे हे काही दिवसांपूर्वी अमरावती येथे आले असता त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्यावर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे चे कार्यकर्ते मात्र भगवा ध्वज घेऊन रॅली काढू, असे म्हटल्याने या वादात आणखी ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

     

    महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधावरून राज्याचे राजकीय वातावरण शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी वातावरण तापवलेले असतांना पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. भिडे यांनी १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वज ऐवजी भगवा झेंडा फडकावा, असा आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यावरून आता राज्यात पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. त्यांनी तिरंगा ध्वजाबाबत दिलेल्या आदेशावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया देत संभाजी भिडे यांना इशारा दिला. भगव्याचा सहारा घेऊन तिरंग्याला डीवचण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा कडू यांनी दिला आहे. अमरावतीत बच्चू कडू यांच्याकडून सायकल तिरंगा सन्मान रॅली काढण्यात येणार आहे. अमरावती शहर ते यावली शहीद यांच्या घरापर्यंत सायकल तिरंगा सन्मान रॅली काढणार आहेत. संभाजी भिडे यांनी राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा अवमान करू नये. त्यामुळे असंख्य हिंदूवर संशयाची सुई निर्माण होईल, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

    bachchu kadu Mahatma gandhi Sambhaji bhide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.