पुणे प्रतिनिधी: सिद्धांत पाटील
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव थोरांदळे येथील एका २५ वर्षीय महिलेचा पती घराबाहेर नोकरीसाठी गेलेला असतांना एक ३५ वर्षीय तरुण महिलेच्या घराबाहेर येवून तिला शिवीगाळ केल्याची तक्रार महिलेने पोलिसांना ईमेल द्वारे केली असून पोलीस स्थानकात गेली असता त्या महिलेची पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, माझे पती सचिन हे नोकरी कामामुळे बाहेर गावी वास्तव्यास असल्याने मौजे थोरांदळे गावच्या हद्दीत माझ्या राहत्या घरी मी माझे लहान बाळ व सासू असे आम्ही ३ व्यक्तीच राहण्यास असतो. दि. .०२/०८/२०२३ रोजी रात्री १०:०० वा.च्या सुमारास राहुल पांडुरंग घुले (वय ३५) हा व्यक्ती माझ्या राहत्या घरी कोणेही पुरुष नसताना घरी येवून शिवीगाळ करू लागला सदरच्या व्यक्ती ही माझ्या बाबत अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी करत असताना मी व माझ्या सासूनी घराचा दरवाजा बंद केला असता गैरअर्जदार ह्यानी घरावर दगड फेक केली आहे.
सदरचा प्रकार माझ्या पतींना सांगितले असता दि. ०३/०८/२०२३ रोजी राहुल पांडुरंग घुले ह्यांनी माझ्या पतीस ही शिवीगाळ केली असून त्याना ही हाताने मारहाण करत धक्काबुक्की केली आहे. तसेच माझ्या बाबत पुन्हा अश्लील भाषा वापरली आहे माझ्या समजाबाबत चुकीचे शब्द वापरत जातीवाचक शिवीगाळ केली आहे व तुम्हास पोलीस स्टेशनच्या जेल मध्ये बरोबर टाकतो असे धमकावले आहे. वरील गैरअर्जदार हे रागीट व खुनशी स्वभावाचे असल्याने व रात्री अपरात्री घरी येत असल्याने त्याच्या पासून आमच्या कुटुबायाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी आपण सदर प्रकाराची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी ही नम्र विनंती आहे.


