Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव बसची ट्रकला जबर धडक !
    क्राईम

    भरधाव बसची ट्रकला जबर धडक !

    editor deskBy editor deskAugust 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यात नियमितपणे बसचा कुठे ना कुठे अपघात होत आहे. नुकतेच भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे भरधाव बसने बंदुकीची पावडर वाहून नेणार्‍या ट्रकला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेसात वाजता घडली. या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी बस चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, आयुध निर्माणी इटारसी येथून बंदुकीत भरण्याची बॉल पावडर घेऊन ट्रक (एम.पी.05 जी.6962) वरणगाव फॅक्टरीत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल आमंत्रण जवळील फॅक्टरी रस्त्यावर ट्रक वळण घेत असताना भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणारी भरघाव बस (एम.एच.बी.टी 4015) ने या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे मागच्या बाजूचे नुकसान झाले तर बसच्या पुढच्या बाजूचे नुकसान झाले. दरम्यान, फॅक्टरीचे व्यवस्था अधिकारी राहुल पाटील यांनी अपघातस्थळी भेट दिली. वरणगाव पोलिसात ट्रक चालक संतोष रामस्वरूप यादव (42, आयुध निर्माणी, इटारसी) यांच्या फिर्यादीवरून बस चालक भरतसिंग फुलचंद डुमाले (शिवगाव, गारज, ता.वैजापूर संभाजीनगर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    #accident Varangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.