Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निरपराध चिमुकली कल्याणीच्या खुनाचे रहस्य उलघडले; पोलिसांचा संशय अखेर खरा ठरला..!
    भडगांव

    निरपराध चिमुकली कल्याणीच्या खुनाचे रहस्य उलघडले; पोलिसांचा संशय अखेर खरा ठरला..!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 3, 2023Updated:August 3, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यात ७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका नराधमाने अत्याचार करीत मृतदेह गोठ्यात टाकल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. स्वप्नील उर्फ सोन्या पाटील, वय १९, ता. भडगाव असे आरोपीचे नाव आहे.

    पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख,यांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते.
    त्यावरुन स्थनिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश राजपुत, पोउपनिरी गणेश वाघमारे, गणेश चोभे, पोह विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, महेश महाजन, अनिल जाधव, अकरम शेख, किशोर राठोड, ईश्वर पाटील, किरण चौधरी, हेमंत पाटील, हरिष परदेशी, महेश पाटील, रमेश जाधव, भारत पाटील, प्रमोद ठाकूर, दर्शन ढाकणे यांचे पथक तयार करण्यात आले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी अल्पवयीन पिडीत मुलगी हिचा मृतदेह हे भडगाव पो.स्टे. हद्दीत आरोपीच्या खळयातील कुट्टीच्या ढिगा जवळ चप्पल मिळून आली. त्यावर कुट्टीचा ढिग उपसून पाहिला असता अल्पवयीन मुलीचे मृतदेह आढळून आला.
    त्यानंतर तपासात खळयाचे मालक याची व त्याचे कुटुंबाची चौकशी केली असतांना खळयाच्या मालकाचा मुलगा स्वप्नील उर्फ सोन्या पाटील, वय १९, ता. भडगाव जि. जळगाव याच्यावर जास्त संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.

    आरोपीस अधिक तपासकामी भडगाव पो.स्टे.चे ताब्यात दिले असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मागर्दशनाखाली पो. निरी. श्री राजेद्र पाटील व त्यांचे पथक हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    संकट मोचकाच्या तथाकथित हनुमानाची भुसावळच्या विजुभाऊची सुपारी यावलमध्ये फेल

    November 17, 2025

    धावत्या कारची दुचाकीला जबर धडक :  तरुण जागीच ठार !

    July 11, 2025

    ओव्हरटेक करण्याच्या नादात रिक्षा पलटी : गुन्हा दाखल !

    June 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.