जामनेर : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील एका गावात पत्नीने बाजार करून आणण्यास सांगितले असता याचे पतीला वाईट वाटल्याने त्याने पत्नीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात पती विरोधात पत्नीने गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पहुर पेठ या गावी एका ३५ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास असून ती शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह होत आहे. दिनांक ३० जुलै रोजी दुपारच्या सुमारास सदरील महिलेने आपल्या पतीला बाजार करून आणणेबाबत बोलली असता या बोलण्याचे पतीला वाईट वाटल्याने त्याने दारूच्या नशेत आपल्या पत्नीला लाथा बुक्क्यांनी पाठीवर व तोंडावर मारहाण करीत पत्नीच्या तोंडातील दात पाडले जर तू यापुढे मला काही बोलले तर तुला मारून टाकीन अशी धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी पत्नीने १ ऑगस्ट रोजी पहूर पोलीस स्थानकात धाव घेत आपल्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत हे करीत आहे.


