Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काय सांगता : जळगावात येणार तुकाराम मुंढे ?
    जळगाव

    काय सांगता : जळगावात येणार तुकाराम मुंढे ?

    editor deskBy editor deskJuly 31, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरात गेल्या आठवड्यापासून सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाबाहेर साखळी उपोषण सुरु केले होते. त्यात मनपा आयुक्तांच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले होते. पण पाचव्या दिवशी शहराचे आ.राजूमामा भोळे यांनी हे आंदोलन सोडविण्यात आले होते तर दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम सुरु केली असून मनपात तुकाराम मुंडे यांना प्रशासक म्हणून बसविण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.

    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, जळगांव शहरांत गेल्या ५ ते ६ वर्षापासुन समस्यांचा महापुर असतांना प्रशासनाच्या नाकरते पणामुळे जळगांव करांना खडयांच्या मोठया प्रमाणात समस्यांचा मोठा सामना करावा लागत आहे. निधी येवुन देखील पारदर्शक पणे रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरीकांना आहे त्याच परिस्थीतीत मृत्युचा सापाळा झालेल्या जळगांवच्या रस्त्यावर जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. प्रशासक म्हणुन आयुक्त म्हणुन सबसेल फेल ठरलेल्या महापालिका आयुक्तांच्या तात्काल हकालपट्टी करावी अशी मागणी प्रहार जनशक्तीच्या वतीने करण्यात येत आहे. जळगांव शहर नागरीकांच्या समस्येवर फुंकर घालण्यासाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने
    जळगांव शहर महापालिकेवर प्रशासक म्हणुन श्री. तुकाराम मुंडे साहेब यांची नियुक्ती करावी या आशयाची मागणी त्यांनी केली आहे. सोमवार सकाळी १० वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन कोर्ट चौकात राबवत असुन त्याव्दारे राबवुन प्रशासन तसेच लोकप्रति निधी यांचे लक्षवेधनेसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. अन्यायग्रस्त नागरीकांनी या मोहीमेस सहभागी व्हावे असे आव्हान प्रहार जन्नशक्तीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

    नागरीकांकडुन मालमत्ता कर वसुल करण्यात येतो मात्र त्या तुम्ही सुविधा मात्र शुन्य मिळतात. अनेक राजकीय पक्षात सत्ता बघुन देखील जळगांवला पाहीजो तो दिलासा मिळालेला नाही. अनेक आश्वासने देवून वर्षानुवर्ष सत्तेत राहणाऱ्या पक्षांनी देखील जळगांवकरांच्या समस्येकडे तोंड फिरविले आहे. जळगांव महापालिका प्रशासनातील सर्वेसर्वा असलेल्या आयुक्तांनी पाहीजे त्या प्रमाणात दखल घेतलेली नाही. आयुक्तांनी कायदेशिर लढा देवुन पुन्हा नियुक्ती मिळवली मात्र जळगांव करांच्या समस्या सोडविण्यात आयुक्त अपयशी झाले आहे. लोकप्रतिनिधी या सोबतच प्रशासनातील अधिकाऱ्यांकडुन जळगांवकरांच्या अपेक्षा कोणत्या आहे. म्हणुनच महापालिका प्रशासक म्हणुन मा. श्री. तुकाराम मुंडे साहेब यांची नियुक्ती करावी अशी मागणी प्रहार जनशक्तीच्या वतीने करण्यात येत आहे. जळगांव मनपावर प्रशासक हवा. आणि तेही तुकाराम मुंडे साहेबांसारखे शहरांतील समस्या मोठया प्रमाणात व सुविधा आहे. त्यावर नियंत्रण कोणाचेच राहीलेले नाही. कोटयावधी रुपये खर्च करुन शहरांत साफसफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिला. तरी शहरांत अस्वच्छता असुन जनतेच्या पैश्यांची उधळ होत आहे.
    1. शहरांतील रस्ते, खड्डे, नाले -साफसफाई कामांचे ऑडीट करावे, दोन पावसांतच नाले थुंबुन शहरांत पाणी साचले आहे. नियमीत असलेल्या पाण्याबाबत निचरा उपाययोजना करण्याची गरज आहे. 2.गेल्या अनेक वर्षापासुन शहरांत अमृत योजनेचे काम सुरु आहे. मात्र नियोजन नसल्याने अद्यापर्यंत काम पुर्ण झालेले नाही.
    3. प्रेम नगर येथील बजरंग बोगदा पाण्यात भरतो मात्र त्याबाबत देखील उपाययोजना करण्यात आलेली नाही. बनवितांना नियोजन शुन्य काम करुन जनतेच्या पैशा खर्च केला आहे.
    4. महामार्गावर संमातर रस्ते अजुनही तसेच आहे. 5. आपत्ती नियंत्रण कक्ष कागदावरच आहे.
    6. कोटयावदी रुपये खर्च करुन कामाची गुणवत्ता गंभीर असुन साधे कारपेटही रस्त्यावर झालेले
    नाही. रस्त्याचे कामाचे थर्डपार्टी ऑडीट करावे. या सर्वावर उपायोजना करण्याकरीता यांचेसारखे आदर्श वत अधिकारी यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करावी. सदर स्वाक्षरी मोहीम घेवुन सर्व स्वाक्षरीत जिल्हाधिकारी मार्फत निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ना.बच्चुभाउ कडु, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष-प्रहार जनशक्ती पक्ष अनिल चौधरी यांचेकडे मागणी करणार आहोत. यावेळी अध्यक्ष प्रवीण संतोष पाटील, उपाध्यक्ष किशोर वासुदेव सैदाणे, श्री पंकज वसंतराव पवार, सरचिटणीस विजय श्रीराम पाटील, श्री जतीन बळवंत पंड्या, चिटणीस श्री कल्पेश चंद्रकिरण सपकाळे, श्री रोहित अनिल कोठावदे, श्री जितेंद्र वाणी, सदस्य श्री निलेश जयराम बोरा, श्री गुणवंत देशमुख, श्री राज अरविंद पाटील, श्री केतन विजय झवर, श्री धनंजय अशोक आढाव, वैद्यकीय सहायता महानगर प्रमुख नरेंद्र भागवत सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    #jalgaon Manapa Rajumama bhole Tukaram mundhe
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025

    पारोळा तालुक्यात जाळपोळ; मुलीच्या नातेवाईकांचा संताप हिंसक वळणावर

    December 22, 2025

    आ.चव्हाणांची जादू चाळीसगावात चालली : थेट नगराध्यक्षपदी प्रतिभा चव्हाण !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.