Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिरसोलीच्या मिरवणुकीत वाद अन दोन तरुणावर चॉपर हल्ला !
    क्राईम

    शिरसोलीच्या मिरवणुकीत वाद अन दोन तरुणावर चॉपर हल्ला !

    editor deskBy editor deskJuly 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील शिरसोली प्र.न.गावात मोहरम सणानिमित्त काढण्यात आलेल्या सवारी मिरवणुकीमध्ये शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास वाद होऊन दोन जणांवर चॉपरने वार केल्याने ते जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली प्र.न येथील मोहरम सणानिमित्त शुक्रवारी रात्री सवारी मिरवणूक काढण्यात आली. होती. शिरसोली येथे ही मिरवणूक सुरू असताना समोर गर्दी वाढू लागली. त्यादरम्यान वाद उफाळला व सर्वजण गर्दीच्या दिशेने धावू लागले. यावेळी एकाने चॉपरने वार केल्याने हेमंत मुरलीधर बारी (१७) व मयूर रवींद्र महाजन (२२) हे दोघे जण जखमी झाले. या घटनेने परिसरात पळापळ सुरू झाली. पोलिस पाटील श्रीकृष्ण वराडे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर एक जखमी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यावेळी त्याच्यावर उपचार आवश्यक असल्याने त्याला पोलिसांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. यादरम्यान रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे उपनिरीक्षक पोटे यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.