Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माय-लेकीला कपडे फाटेपर्यत मारहाण ; राज्यात घडली संतापजनक घटना !
    क्राईम

    माय-लेकीला कपडे फाटेपर्यत मारहाण ; राज्यात घडली संतापजनक घटना !

    editor deskBy editor deskJuly 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    देशातील मणिपूर येथे घडलेल्या घटनेचे आता राज्यात देखील पडसाद उमटू लागले आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी घटना आता राज्यातील साताऱ्यात फलटणमधील कुरवली खुर्द या गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणात मायलेकीला संपूर्ण गावासमोर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघींचे कपडेही फाटले. त्या दोघींना फरफटत नेल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे. मुलांच्या भांडणातून हा प्रकार घडला आहे.

    कुरवली खुर्द या ठिकाणी काल सायंकाळी ही मारहाणीची घटना घडली. यावेळी दोघींना फरफटत नेण्यात आलं यामध्ये त्या दोघींचेही कपडे फाटले. संबंधित महिला विधवा असून तिची मुलगी 16 वर्षांची आहे. घटनेनंतर मायलेकींची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. यानंतर फलटण पोलिसांनी सकाळी पीडित महिलेसह मुलीला पोलीस ठाण्यात आणले. पोक्सा आणि अ‍ॅट्राॅसीटी अंर्तगत मारहाण करणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शाळकरी मुलांमध्ये क्रिकेटच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्याच वादातून ही मारहाणीची घटना घडली असल्याचे पीडित महिलेने आणि तिच्या मुलीने आपल्या जबाबात म्हंटले आहे. फलटण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.