Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ !
    क्राईम

    तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ !

    editor deskBy editor deskJuly 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरातील माहेर असलेल्या एका विवाहितेचा तीन लाख रुपयांच्या मागणीसाठी छळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगर येथील माहेर असलेल्या विवाहिता स्वाती मनोज पाटील (वय-२४) यांचा विवाह मार्च २०१९ मध्ये डांभूर्णी येथील मनोज प्रेमचंद पाटील याच्याशी झालेला आहे. यानंतर विवाहितेला शुल्लक कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. हा प्रकार झाल्यानंतर व्यापार करण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपयांची मागणी केली. दरम्यान विवाहिते पैशांची पुर्तता न केल्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तिच्या अंगावरील सर्व दागिने काढून दिले. शिवाय सासू, सासरे, जेठ जेठाणी आणि ननंद यांनी शारिरीक मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहितेने माहेरी निघून आल्यानंतर शनिवारी २२ जुलै रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मनोज प्रेमचंद पाटील, सासू भारती प्रेमचंद पाटील, सासरे प्रेमचंद तुळशीराम पाटील, जेठ विवेक प्रेमचंद पाटील, जेठाणी तनुजा विवेका पाटील आणि नणंद पल्लवी योगेश पाटील सर्व रा. डांभूर्णी ता.यावल यांच्याविरोधात जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनराज निकुंभ करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026

    काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.