Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिसांची मोठी कारवाई : बोगस पिक संजीवके औषधांचा दोन लाखांचा साठा जप्त
    क्राईम

    पोलिसांची मोठी कारवाई : बोगस पिक संजीवके औषधांचा दोन लाखांचा साठा जप्त

    editor deskBy editor deskJuly 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील निमखेडी शिवारातील धनश्रीनगरातील घरावर पोलिसांनी शनिवार, २२ जुलै रोजी छापा टाकून सुमारे २ लाख ४ हजाराचा औषध साठा जप्त केला. मुळ चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील संजय -संतोष बेलदार हा त्याच्या धनश्रीनगरातील घरात हे औषध बनवित होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, बिना परवाना बी.टी. स्पेशल पिक संजीवक औषध तयार करून विक्री करत असलेल्या विक्रेत्या बाबत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना ही गुप्त माहिती- मिळाली होती. त्यानुसार कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे , मोहीम अधिकारी विजय पवार यांची सहकार्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह सहायक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय पाटील, सचिन महाजन , दर्शन ढाकणे यांच्या पथकाने शनिवारी धनश्री नगर येथे संजय बेलदार यांच्या घरी छापा टाकला आणि ही कारवाई केली. याठिकाणी औषधाची केळी व कपाशीच्या पिकावर फवारणीसाठीचे विना परवाना असलेला बी.टी.स्पेशल पिक संजीवक, कृषी ह्युमस संजीवक असा सुमारे ३९० लिटरचे एकूण रक्कम २ लाख ४ हजाराचा साठा पोलिसांनी जप्त केला. तपासणीसाठी सदर औषधींचे नमुने घेण्यात आले आहे. याबाबतची पुढील कारवाई जिल्हा कृषी विभाग करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026

    काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.