Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हाधिकारींची माणुसकी : अपघातग्रस्त तरुणाला दिला मदतीचा हात !
    क्राईम

    जिल्हाधिकारींची माणुसकी : अपघातग्रस्त तरुणाला दिला मदतीचा हात !

    editor deskBy editor deskJuly 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या अपघाताच्या मालिकेचा अनुभव थेट जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देखील नुकताच आलेला आहे. जिल्हाधिकारी ग्रामीण भागातील दौरा आटोपून जळगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास येत असतांना महामार्गावर झालेल्या अपघातात एक तरुण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला दिसून आल्यानंतर लागलीच जिल्हाधिकारी अमन मित्तल त्याच्या मदतीसाठी धावून आल्याने त्यांच्या मधील माणूसकीच्या दर्शनाची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

    जिल्हाधिकारी अमन मित्तल हे गुरुवारी भुसावळ शहरातील एक कार्यक्रम आटोपून रात्री जिल्हाधिकारी मित्तल हे त्यांच्या शासकीय वाहनाने पुन्हा जळगावकडे परत येत असताना नशिराबाद गावाजवळ महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार जखमी झाला होता. हा दुचाकीस्वार जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. हे दृश्य पाहून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आपले वाहन तात्काळ थांबविले. त्यानंतर स्वतः वाहनातून खाली उतरले. त्यानंतर जखमी व्यक्तीची तपासणी केली, तसेच एका कपड्याच्या सहाय्याने जखमीच्या डोक्यातून होत असलेला रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर जखमीला स्वतःच्या शासकीय वाहनातून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं. जखमीला वेळेवर रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार झाल्याने त्या व्यक्तीला जीवनदान मिळालं आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यातील तत्परतेमुळे आणि त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान आणि माणुसकी याच्यामुळे जखमी व्यक्तीला जीवनदान मिळाले आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे कौतुक केलं जातं असून या घटनेची जिल्ह्यात मोठी चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.