Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजप आता बाजारबुणग्यांचा पक्ष बनलाय ; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका !
    राजकारण

    भाजप आता बाजारबुणग्यांचा पक्ष बनलाय ; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका !

    editor deskBy editor deskJuly 10, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था 

    प्रथम शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने या पक्षांचे प्रमुख शरद पवार व उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहे. शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवातही झाली असून त्यांनी येवला येथून रणशिंग फुंकले. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे.

    आता पक्ष फोडणे नाही तर पळवून नेणाऱ्यांची गॅंग आलेली आहे. खोक्यांचे आमिष दाखवून त्यांनी आमदार, खासदारांना नेले. पण माझ्यासोबत लाखमोलाचा शिवसैनिक आहे. ते बाळासाहेबांचा फोटो देखील चोरत आहे. कारण त्यांना माहित आहे की, आता महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालणार नाही. एवढच काय भाजप तर आता बाजारबुणग्यांचा पक्ष बनला आहे. त्यांच्यातील निष्ठावंतांना तर आता सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. ते विदर्भातील पोहरादेवी येथून सभेला संबोधित करत होते.
    आमदार, खासदार गेले तरी चालेल पण माझ्यासोबत दमदार शिवसैनिक उभा आहे. असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. सत्ताधारी प्रचंड माजले आहेत. कारण त्यांच्याकडे पैसा आहे, चोरून नेलेल्या अनेक गोष्टी आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर करून दडपशाही करू लागले आहेत. पण माझ्या लाखमोलाचा शिवसैनिक ते घेऊ शकत नाही. असे उद्ध ठाकरे यांनी बोलत शिंदेसेनेवरही निशाणा साधला.
    माझे नेतृत्व मोदी-शहांनी नाही ठरवायचं, ते माझी मायबाप जनता ठरवेल. माझा पक्ष, चिन्ह देखील ते घेऊ गेले आहेत. पण तरी देखील आजच्या सभेतून त्यांना दिसेल की, जनता कोणासोबत आहे. माझा लढा सुरूच राहणार आहे. पण त्यात तुम्हा जनतेची साथ तितकीच लागणार आहे. चला एकत्र येवून या दडपशाही सरकारला हद्दपार करू, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले.
    आजच्या सभेला इतक्या मोठ्या संख्येने लोक येते आले आहेत. पक्ष, चिन्ह जरी हिसकावून घेतले असेल. तरी त्यांच्या सोईनुसार वागणाऱ्या आंधळ्या निवडणूक आयोगाचे डोळे उघडतील. जरी त्याने डोळे उघडले नाही तर आता जनतेचे डोळे उघडले आहे. येत्या निवडणूकात त्यांना समजेल की खरी शिवसेना कोणाची आहे. असा घणाघात ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केला आहे.
    पूर्वी मतदानातून सरकार जन्माला यायचे पण आता खोक्यातून सरकार जन्माला यायला लागले आहे. असा घणाघात ठाकरेंनी शिंदेसह भाजपवर केला आहे. पण येत्या काळात आपले सरकार नक्की येईल. पोहरादेवीच्या संस्थानाचे आराखड्यानुसार विकास करण्यासाठी मी कटीबद्द असणार आहे. असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.
    काही चाळीस लोकांनी निष्ठेला कलंक लावला आहे. पण तो कलंक आता येत्या निवडणूकीत पुसायचा आहे. त्यासाठी शिवसैनिकांची ताकद गरजेची आहे. मोठ्या ताकदीने तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहाल असा विश्वास मला आहे. तर येत्या काळात नक्कीच निष्ठेला कलंक लावणाऱ्यांना आपण घरचा मार्ग दाखवूया. असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
    कोणी प्रश्न विचारायला लागले की, त्याला अडचणीत आणण्याची वृत्ती सद्या सर्वत्र दिसून येत आहे. पण हे लोकशाहीसाठी घातक आहे. आता समान नागरी कायदा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण हा कायदा नेमका काय आहे लोकांना कळू द्या, समान नागरी कायदा कशासाठी पाहिजे याचे महत्त्व सांगा. एकवेळ एक देश- एक कायदा मान्य असेल. पण एक देश एक पक्ष कदापी मान्य होणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी भाजववर केला.
    भाजपला शिवसेना हवी, पण ठाकरे नको आहे. आता मोदी सरकारकडून समान नागरी कायदा लागू करण्याचे काम सुरू आहे. एकवेळ आम्हाला एक देश- एक कायदा मान्य, पण एक देश एक पक्ष कदापी मान्य होणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला.

    #bjp #cmshinde #ncp #shivsena #udhavthaakre
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : केवायसीची अखेरची तारीख जाहीर !

    October 29, 2025

    साईभक्तांच्या फॉर्च्युनरचा भीषण अपघात : तीन ठार, चार गंभीर जखमी

    October 29, 2025

    आता माघार नाहीच : बच्चू कडूंनी सरकारला दिला अल्टिमेटम !

    October 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.