Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २० वर्षीय तरुणाने दुसऱ्या मजल्यावर घेतला गळफास !
    क्राईम

    २० वर्षीय तरुणाने दुसऱ्या मजल्यावर घेतला गळफास !

    editor deskBy editor deskJuly 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद गावात राहणाऱ्या तरूणाने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जावून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या तरुणाचे धीरज प्रभाकर कोष्टी (वय-२०) असे नाव असून त्याने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी खालच्या घरात धीरज याचे आई वडील हजर होते. याचदरम्यान धीरजने मृत्यूला कवटाळले, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शहरात धीरज कोष्टी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. तो सध्या बीसीएच्या वर्गात शिक्षण घेत होता. शनिवारी सायंकाळी धीरज हा आपल्या आई वडिलांसोबत खालच्या खोलीत बसला होता. त्यानंतर काही वेळाने तो राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावर गेला व याठिकाणी दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही धीरज खाली का येत नाही, हे पाहण्यासाठी धीरजचे कुटुंबीय वरऱ्या मजल्यावर गेले असता, धीरज हा गळफास घेतलेल्या दिसून आल्यावर आई वडिलांनी हंबरडा फोडला. स्थानिक नागरिक व शेजारी राहणाऱ्या मित्रांनी धाव घेवून धीरज याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी मयत घोषीत केले. धीरज याच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत सैदाणे आणि शरीफ शेख करीत आहे. मयत तरूणाच्या पश्चात आई कांताबाई, वडील प्रभाकर कोष्ठी, तीन बहिणी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.