Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवऱ्याने केला बायकोचा खून आणि स्वतःही केली आत्महत्या
    क्राईम

    नवऱ्याने केला बायकोचा खून आणि स्वतःही केली आत्महत्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 29, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथे पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा आवळून खून करून  शेतातील  झाडाला स्वतः पँट च्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली पत्नीचा खून का केला यामागील कारण अजून उलगडले नाही.पिंपळगाव (हरे.) पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु”  येथे  राहणारे  सतिष धनसिंग परदेशी (वय – ३८), गायत्री सतिष  परदेशी (वय – ३२), ६ वर्षाचा मुलगा व ४ वर्षाच्या मुलीसह  राहतात 28 च्या रात्री संपूर्ण कुटुंब   झोपेत असताना  शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान सतिष धनसिंग परदेशी याने गाढ झोपेत असलेली पत्नी गायत्री सतिष परदेशी हिचा दोन्ही हाताने गळा आवळून ठार केले. नंतर घराबाहेर निघत असतांना आरडाओरड करून पळत असतानांच शेजारच्या घरी राहत असलेल्या त्याचा लहान भाऊ संदिप परदेशी यांच्या सदरची बाब लक्षात आल्यानंतर त्याने सतिषचा पाठलाग करून त्यास पकडून, तू एवढ्या रात्री कुठे जात आहेस व आरडाओरड का करीत आहेस? अशी विचारणा केली असता सतिषने सांगितले की, तू मला काय अडवतो आहेस, मी माझी पत्नी गायत्री हिचा गळा दाबून खून केला आहे. असे सांगताच सतिष त्याच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता संदिप ने  घरात जाऊन बघितले असता गायत्री मृत अवस्थेत तर दोघे मुले झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनंतर सतिष परदेशी याने गावाबाहेर पळत जाऊन येथील माजी सरपंच गोकुळसिंग नथ्थुसिंग परदेशी यांच्या शेतात गेल्यानंतर पळसाच्या झाडावर चढत अंगात असलेल्या स्वेटर व नाईट पँटचे दोन तुकडे करून गळ्या भोवती आवळून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. सकाळी घडलेल्या प्रकारची वार्ता गावभर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सतिष याचा शोध सुरू झाला. दरम्यान गावातीलच संजय धना सोनवणे हे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान स्वतःच्या शेतात जात असतांना त्यांना पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सतिष धनसिंग परदेशी याचा मृतदेह आढळून आल्याने त्याने गावात पळत जाऊन घटनेची माहिती दिली.

    दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पत्नीस ठार करून स्वतः गळफास घेणारा इसम काही प्रमाणात वेडसर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, सहायक फौजदार विजय माळी, हवालदार दिपकसिंग पाटील, संदिप राजपूत, वाहनचालक दिपक अहिरे यांनी पंचनामा केला. मयत पती व पत्नी यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले.

    सावखेडा येथील सतिष धनसिंग परदेशी व संदिप धनसिंग परदेशी यांचे वडील धनसिंग चिंधा परदेशी यांचे रविवारी दि.२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे शनिवारी दि. ३० रोजी सावखेडा येथून अस्थी नासिक येथे नेण्यात येणार होत्या. दरम्यान दुसऱ्या दिवशी अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम असल्याने सतिष परदेशी व त्याचे कुटुंब दुसऱ्या दिवशी लवकर उठून तयारी करण्यासाठी रोजच्या वेळेपेक्षा लवकर झोपले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026

    मुंब्रा विजय भाषणातील वक्तव्यावरून वाद; सहार शेख यांचा खुलासा व माफी

    January 24, 2026

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.