Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाशिक : राष्ट्रवादी कार्यालय ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटात जोरदार राडा !
    क्राईम

    नाशिक : राष्ट्रवादी कार्यालय ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटात जोरदार राडा !

    editor deskBy editor deskJuly 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था 

    राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर  राष्ट्र्वादी कॉंग्रेस पार्टीत उभी फूट पडली आहे. दरम्यान, काल नाशिक शहरातील राष्ट्रवादी कार्यालय ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने आले. कार्यकर्ते आमनेसामने आले असून जोरदार राडा सुरू झाला. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. नाशिकमध्ये आता अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी समोर आले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता त्यांचा समोर उपस्थित आहे. तर सकाळी देखील अशीच घटना घडली होती.

    अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. नाशिकमध्येही छगन भुजबळ व अजित पवार यांच्या समर्थकांचा एक गट व शरद पवा यांच्या समर्थकांचा एकत्र गट असे दोन गट पडले आहेत. दरम्यान, दोन्ही गटात चांगलाच राडा सुरू झाला आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. जोरदार घोषणाबाजी करत आहे. दरम्यान, छगन भुजबळ व अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बॅनरबाजी करून कार्यालयाचा ताबा घेतला. त्यावरून दोन्ही गटात चांगलीच झुंपली आहे. महाराष्ट्रात कोठेही नाही असा अभूतपूर्व गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शरद पवारांचे फोटो असलेले होर्डिंग कार्यकर्त्यांनी गळ्यात घालून कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरूवात केली.

    राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांना बैठक घेण्यापासून व कार्यालयात जाण्यापासून रोखले. त्यामुळे जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी केला आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.