Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस वाहनावर पडले वृक्ष ; अधिकाऱ्यासह एक कर्मचारी जागीच ठार तर तिघं जखमी !
    क्राईम

    पोलीस वाहनावर पडले वृक्ष ; अधिकाऱ्यासह एक कर्मचारी जागीच ठार तर तिघं जखमी !

    editor deskBy editor deskJune 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी

    चाळीसगावकडून एरंडोलच्या दिशेने येणाऱ्या चालत्या पोलीस वाहनावर अचानक वृक्ष पडल्यामुळे एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचा मृत्यू तर जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पाऊस सुरू असतानाच पोलीस वाहनावर चिंचेचे जीर्ण झाड कोसळून झालेल्या अपघातात जळगाव गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. एरंडोल शहरापासून काही अंतरावरील अंजनी धरणाजवळ हा भीषण अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. या अपघाताने पोलीस दलात शोककळा पसरली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय बाजीराव चौधरी (जळगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

    पिलखोड जिल्हा बँक शाखेत वनविभागाच्या अधिकार्‍यांनी तत्कालीन व्यवस्थापकाच्या सहभागाने सुमारे दिड कोटींचा अपहार करीत वनविभागाची फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा तपास जळगाव गुन्हे आर्थिक गुन्हे शाखा करीत असल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी गुरुवारी सकाळीच पिलखोड, ता.चाळीसगाव येथे शासकीय वाहनाने (एम.एच.19 एम.0751) रवाना झाले होते.

    दिवसभर केलेल्या चौकशीनंतर तपास पथक जळगावकडे येत असताना एरंडोल शहराजवळील अंजनी धरणानजीक रात्री जोरदार वादळासह पावसाला सुरूवात झाली व त्याचवेळी जीपच्या पुढील भागावर झाड कोसळताच चालक अजय बाजीराव चौधरी (जळगाव) व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांचा जागीच मृत्यू झाला तर चंद्रकांत सीताराम शिंदे, भरत नारायण जेठवे व निलेश प्रकाश सूर्यवंशी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. जखमींना एरंडोल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, यांनी धाव घेत माहिती जाणली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.