Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी कारवाई : जिल्ह्यात १८ लाखांचा गुटखा पकडला !
    क्राईम

    मोठी कारवाई : जिल्ह्यात १८ लाखांचा गुटखा पकडला !

    editor deskBy editor deskJune 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी नेहमीच मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात करण्यात येते या संदर्भात वारंवार कारवाई होऊनही तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही.आज वाहनातून तब्बल १८ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असल्यामुळे मुक्ताईनगर येथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची तस्करी होत असते. अलीकडच्या काही महिन्यांचा विचार केला असता, बऱ्याचदा या प्रकारे गुटख्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जप्त करण्यात आले आहे. आज सकाळी अशाच प्रकारची कारवाई मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील चेक पोस्टजवळ करण्यात आली आहे.
    मध्यप्रदेशातून एम.एच.१९ बी.एम.२३८४ या क्रमांकाच्या महेंद्रा बोलेरो पीकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची तक्रार नाशिक येथील गुप्तचर खात्याकडे करण्यात आली होती.या अनुषंगाने चेक पोस्टवर सापळा रचून सदर वाहन थांबविण्यात आले.यात तपासणी केली असता १८ लाख रूपयांचा विमल या ब्रँडचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी गुटखा आणि वाहन मिळून एकूण २२ लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा सीमेवर असलेल्या चेक पोस्ट प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.