जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीस एका तरुणाने घरातून पळवून नेल्याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्थानक हद्दीत असलेल्या एका गावातून १७ वर्षीय मुलीस दिनांक २४ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गावातील एका तरुणाने काही तरी फूस लावून पळून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पहूर पोलीस स्थानकात एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल केले करण्यात आला आहे पुढील तपास सहायक फौजदार हंसराज मोरे हे करीत आहे.


