Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सैन्यात नोकरीचे आमिष तरुणाची लाखो रुपयात फसवणूक !
    क्राईम

    सैन्यात नोकरीचे आमिष तरुणाची लाखो रुपयात फसवणूक !

    editor deskBy editor deskJune 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    भारतीय सैन्य दलात स्पोर्टस् कोट्यातून चालक म्हणून भरती करून देतो, असे आमिष दाखवित एका तरुणाची ६ लाख १० हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील अर्जुन सोपान गवळी (वय.२३) हा युवक अनेक दिवसांपासून खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत आहे. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या ओळखीचे संतोष रमेश वराडे (वय ५०, रा. भोपाळ, मध्यप्रदेश) यांनी अर्जुनला सैन्यात लावून द्या असे सांगितले, तसेच यासाठी पैसे भरावे लागतात, तुम्ही पैसे दिले तर अर्जुनला स्पोर्टस् कोट्यातून सैन्यात चालक म्हणून नोकरी मिळू शकते असे आश्वासन दिले. त्यानंतर भोपाळ येथे तुषारसिंग मलिक व साहील धडवाल यांना ४ लाख १० हजार रुपये बँक खात्यातून, तर ४ लाख रोख अशी एकूण ८ लाख १० हजार रुपयांची रक्कम २ मार्च २०१८ मध्ये दिली. मात्र, पैसे दिल्यानंतरदेखील नोकरी मिळत नसल्याने अर्जुन गवळी व सोपान गवळी यांनी अनेकदा वराडे यांच्याकडे पैसे परत मागितले. मात्र, नोकरी लवकरच मिळेल असे सांगत वराडे व इतरांनी वेळ काढून नेला.

    नोकरी मिळणार नाहीच ही खात्री झाल्यानंतर अर्जुन गवळीने पैसे मागितले. त्यापैकी २ लाख रुपयांची रक्कम मिळाली, इतर रक्कम मात्र अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे अर्जुन गवळी याच्या फिर्यादीवरून शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री ७ वाजता संतोष रमेश वराडे, तुषारसिंग मलिक व साहील धडवाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमोल मोरे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.