Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिक्षकाने लाज सोडली ; दारू पिऊन वर्गातच झोपला !
    क्राईम

    शिक्षकाने लाज सोडली ; दारू पिऊन वर्गातच झोपला !

    editor deskBy editor deskJune 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    बारामती तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सजग नागरिकाने अचानक शाळा भेट केल्याने सदर प्रकार समोर आला. ही घटना बारामती तालुक्यातील तरडोली येथील भोईटे वस्ती येथील शाळेतील आहे. याबाबतचा व्हिडीओ बनविला गेल्याने बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. भरत चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे. भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत 25 विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र सरावलेल्या शिक्षकाने ती वाया घालवली आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद गुरुजी पहावा लागला. शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून झोपी गेला होता. भरपूर दारू प्यायल्याने तर शुद्धीत नाही हे नागरिकांच्या लक्षात आले आणि त्या व्यक्तीने संबंधित घटनेचा व्हिडिओ केला. याची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. त्यावरून संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे.

    घडलेल्या संपूर्ण प्रकारानंतर शिक्षकाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत जे समोर येईल त्यावर कडक कारवाई होईल असे शिक्षणाधिकारी गावडे यांनी सांगितले आहे तर मुख्याध्यापकाला देखील नोटीस बजावली असल्याचे गावडे यांनी सांगितले. समाजात शिक्षकाला वेगळं स्थान प्राप्त आहे. शिक्षण हे अनेकांच्या आयुष्यात गुरुस्थानी असतात. शिक्षकांच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थी आणि पालक भविष्याची स्वप्न रंगवत असतात. मात्र सध्या शिक्षकीपेशाला कलंक लागेल अशा घटना समोर येत आहे. लैंगिक छळ, बलात्कार आणि आता तर चक्क दारु पिऊन वर्गात झोपले असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.