Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात कामगाराने घरात घेतला गळफास !
    क्राईम

    जळगावात कामगाराने घरात घेतला गळफास !

    editor deskBy editor deskJune 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील समता नगर परिसरात एका घरात मुलगा बाहेर ओट्यावर बसला असताना, पित्याने घरातील बाथरूममध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी रामकृष्ण निकम (वय ५८, रा. समता नगर) असे मृत प्रौढाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगर परिसरातील शिवाजी निकम हे पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. सेंट्रिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पत्नी ज्योती निकम या कामावर निघून गेल्या. दुपारी शिवाजी निकम हे मुलगा राजेंद्र सोबत घरी होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुलगा हा घराबाहेर बसलेला असताना शिवाजी निकम यांनी राहत्या घरातील बाथरूममध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026

    जळगाव मनपात दोन्ही सभापती बिनविरोध; डॉ.चंद्रशेखर पाटलांचा अर्ज दाखल !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.