Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीने संपविली जीवनयात्रा ; तरूण अटकेत !
    क्राईम

    अल्पवयीन मुलीने संपविली जीवनयात्रा ; तरूण अटकेत !

    editor deskBy editor deskJune 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने निश्चित केलेला विवाह मोडण्यास भाग पाडून ब्लॅकमेल करीत या त्रासास कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील एका गावातील घडली होती. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकर जामनेर पोलीस ठाण्यात गोकुळ पारधी या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय मुलीचे संशयित गोकुळ पारधी सोबत प्रेमसंबंध होते. कुटूंबियांनी तरुणीचे अन्य तरुणासोबत लग्न निश्चित केल्याने आरोपीने पिडीतेला सांगून हे लग्न मोडण्यास सांगितले व लग्न न मोडल्यास होणार्‍या भावी पतीला प्रेमसंबंधाल कल्पना देईल, अशी धमकीही दिली. आई-वडिलांची बदनामी टाळण्यासाठी तरुणीने निश्चित केलेला विवाह मोडला मात्र त्यानंतरही आरोपीने ब्लॅकमेल करीत फोटो व रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पीडीतेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना 12 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. मुलीच्या आत्महत्येस संशयितच कारणीभूत असल्याने मयत पीडीतेच्या वडिलांनी आरोपी गोकुळ सुनील परधी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.